केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय उद्देश्य स्पष्टपणे दिसून आला. या अर्थसंकल्पातून दिसून आले, की देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सीतारामन या कोणतेही पाऊल उचलणार नाहीत.
या अर्थसंकल्पामध्ये 'लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स'ला बरखास्त केल्याची घोषणा नसल्यामुळे सेन्सेक्सही निराश झाला आहे. जे लोक नरेंद्र मोदींना ओळखतात, त्यांचे म्हणणे आहे की मोदी हे १९९१ साली नरसिम्हा राव सरकारने केलेल्या उपाययोजनांचे अनुकरण करण्याऐवजी, विशेष उपाययोजना करण्याला प्राधान्य देतात. मात्र, प्राप्तीकर स्लॅब कमी करून सरकारचे जवळपास चाळीस हजार कोटींचे नुकसान होणार आहे, जे सरकारला मान्य आहे. याशिवाय देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांना सार्वभौम संपत्ती निधीवर 100% कर सवलत देण्याचीदेखील सरकारची तयारी आहे. एवढेच काय, तर परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 'डीडीटी'ला बरखास्त करून २२ हजार कोटींचे नुकसान सोसण्याचीही सरकारची तयारी आहे.
सरकारला अशी आशा आहे की यामुळे जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी भारताला आवश्यक असणारी प्रचंड गुंतवणूक मिळेल, जे चार वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स इतके असेल. दंड व व्याज माफ करून थेट करांशी संबंधित 4,90,000 हून अधिक दावे कमी करण्यासाठी “विवाद से विशावास” योजना सुरू करुन, करमाफी देखील देण्यात आली आहे. परंतु अर्थसंकल्पातील मुख्य बातमी म्हणजे, वैयक्तिक करदात्यांना दिलासा आणि आयकर कायदा सुलभ करणे.
अर्थसंकल्पात नवीन व सरलीकृत वैयक्तिक आयकर प्रणाली आणण्याचा प्रस्ताव आहे ज्यात विशिष्ट कर व सूट वगळलेल्या वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर दरात लक्षणीय घट केली जाईल. अर्थसंकल्पात, अस्तित्त्वात असलेल्या १०० हून अधिक प्रकारच्या करांपैकी ७० करांमध्ये मध्ये सूट आणि कपात करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. उर्वरित सवलती आणि वजावटीचे पुनरावलोकन केले जाईल आणि कर प्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी आणि कर दर कमी करण्याच्या उद्देशाने येत्या काही वर्षांत तर्कसंगत केले जाईल. प्रामाणिक कर देयकास प्रोत्साहित करण्यासाठी नवीन करदात्यांची सनद सादर करण्याची चर्चा आहे.
बँक घोटाळ्यांमुळे घाबरलेल्या मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी बँकांमधील ठेवींवर असलेल्या विम्याची रक्कम एक लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णयही या अर्थसंकल्पात घेण्यात आला. अशारितीने, सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा मोदींना हवा होता तसाच आहे. यामध्ये येत्या काही महिन्यात ज्या क्षेत्रांमध्ये वाढ होऊ शकते अशा निवडक क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. मोदींना असा विश्वास आहे, की या नव्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाला आर्थिक बळ मिळेल. या अर्थसंकल्पाला मोदींनी 'सबका साथ' बजेट म्हटले आहे. मात्र, अर्थमंत्र्यांनी सादर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही तासांमध्येच शेअर बाजार कोसळला.