नवी दिल्ली - अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकले आहेत. मात्र यावेळी त्यांना सकारात्मक नव्हे, तर नकारात्मकतेसाठी टाईमच्या मुखपृष्ठावर स्थान मिळाले आहे. दुफळी निर्माण करणारा भारतातील एकमेव नेता म्हणून पंतप्रधान मोदींचा उल्लेख टाईम मासिकात करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
टाईमच्या 'कव्हर'वर पंतप्रधान; दुफळी निर्माण करणारा भारतातील एकमेव नेता म्हणून मोदींचा उल्लेख - भारत
दुफळी निर्माण करणारा भारतातील एकमेव नेता म्हणून पंतप्रधान मोदींचा उल्लेख टाईम मासिकात करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पंतप्रधान मोदी हे हिंदुत्ववादाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे समाजात ध्रुविकरण होत असल्याचा आरोप टाईममध्ये लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान मोदी हे हिंदुत्ववादाचे राजकारण करत आहेत. त्यामुळे समाजात ध्रुविकरण होत असल्याचा आरोप टाईममध्ये लेख लिहिणाऱ्या आतिश तासीर यांनी केला आहे. या लेखात तुर्की, ब्राझील, ब्रिटन, अमेरिकेनंतर भारतातही लोकशाही मुल्यांपेक्षा एखाद्या नेत्याची लोकप्रियता वाढल्याचे तासीर यांनी या लेखात नमूद केले आहे.
‘लोकप्रियतेमुळे कोलमडलेली लोकशाही म्हणून भारताचे नाव घेता येईल’, असे टाईमने प्रकाशीत केलेल्या या लेखाची सुरुवात लेखकाने केली आहे. ‘स्वतंत्र भारताने मिळालेल्या सहिष्णुता, उदारमतवादी धोरण, स्वतंत्र प्रसारमाध्यमे यासारख्या गोष्टीही एखाद्या कटाचा भाग असल्याप्रमाणे २०१४ च्या निवडणुकीनंतर भासवले जात आहे,’ अशी टीका या लेखातून करण्यात आली. तर 'मोदी एक बदल घडवणारा नेता', असा लेखही इयन बेरीमेर यांनी टाईममध्ये लिहिला आहे. या लेखालाही कव्हरस्टोरीवर स्थान देण्यात आले आहे.