हैदराबाद :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक वेबसाईटला जोडलेले ट्विटर अकाऊंट गुरुवारी हॅक झालेले आढळून आले. हॅकर्सनी या अकाऊंटवरुन काही फेक ट्विट पोस्ट केल्या आहेत. क्रिप्टोकरंसी संबंधात चुकीची माहिती देणारे हे ट्विट्स आता हटवण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट झाले 'हॅक'! - मोदी जॉन विक
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट गुरुवारी हॅक झालेले आढळून आले. हॅकर्सनी या अकाऊंटवरून ट्विट करत क्रिप्टोकरंसीची मागणी केली होती. यानंतर काही वेळाने "होय हे अकाऊंट जॉन विकने हॅक केले आहे. आम्ही पेटीएम मॉल हॅक केला नाही" अशा आशयाचे आणखी एक ट्विट पंतप्रधानांच्या अकाऊंटवरुन करण्यात आले...
"कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रधानमंत्री नॅशनल रिलीफ फंडामध्ये क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून तुम्ही सढळ हाताने मदत जमा करा, असे मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो" अशी पोस्ट या हॅकर्सनी केली होती. यासोबतच त्यांनी क्रिप्टोकरंसी जमा करण्यासाठीचा एक डिजिटल अॅड्रेसही या ट्विटमध्ये दिला होता. यानंतर काही वेळाने "होय हे अकाऊंट जॉन विकने हॅक केले आहे. आम्ही पेटीएम मॉल हॅक केला नाही" अशा आशयाचे आणखी एक ट्विट पंतप्रधानांच्या अकाऊंटवरुन करण्यात आले.
यापूर्वी १६ जूनला थोड्या थोड्या अंतराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जोई बिडेन, टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि अॅपलचेही ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. यावेळीही हॅकर्सनी क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून पैशांची मागणी केली होती.