नवी दिल्ली - वरिष्ठ सनदी अधिकारी राजीव तोपनो यांची जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते याआधी पंतप्रधान मोदींचे स्वीय सचिव म्हणून काम पाहत होते. तोपनो हे 1996 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.
याशिवाय, ब्रिजेंद्र नवनीत यांची जागतिक व्यापार संघटनेत स्थायी प्रतिनिधी पदी आणि भारताचे दुतावास म्हणून नेमणूक केली आहे. ते पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. नवनीत हे 1999 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. जागतिक व्यापार संघटनेचे कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत जागतिक व्यापार संघटनेतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका अतिमहत्वाच्या समजल्या जात आहेत. व्यापार आणि आर्थिक विषयांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.
इतरही पाच अधिकाऱ्यांच्या विविध जागतिक स्तरावरील संस्थांमध्ये नेमणुक करण्यात आली आहे.