लखनौ - पहिल्यांदा पाच वर्ष पंतप्रधान पद सांभाळल्यानंतर दुसऱ्यांदा मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष ऐतिहासिक ठरल्याचे मत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मत व्यक्त केले आहे. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याबद्दल, तसेच राम मंदीर आणि तिहेरी तलाकचे प्रश्न मार्गी लावल्याचे श्रेय योगी यांनी मोदींच्या नेतृत्वाला दिले.
'पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिलं वर्ष ऐतिहासिक' - योगी आदित्यनाथ बातमी
या कठीण काळात मोदींनी सर्वात जास्त लक्ष खालच्या वर्गाकडे दिले. तसेच 20 लाख कोटींचे पॅकेज अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जाहीर करून आर्थिक व्यवहारांना चालना दिली - योगी आदित्यनाथ
कोरोना काळात नागरिकांचे हित लक्षात घेता केंद्रातील भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी पोकळ आश्वासने सत्यात उतरवली. अनेक वर्षांपासून देशापुढे असलेल्या समस्या मोदींनी सोडविल्या. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत लढत असलेली लढाई संपूर्ण जगासाठी आदर्श ठरली आहे, असे आदित्यनाथ म्हणाले.
या कठीण काळात मोदींनी सर्वात जास्त लक्ष खालच्या वर्गाकडे दिले. तसेच 20 लाख कोटींचे पॅकेज अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी जाहीर करून आर्थिक व्यवहारांना चालना दिली आहे. भारत लवकरच स्वयंपूर्ण होणार असून सर्वोत मोठा उत्पादन केंद्र बनणार आहे, असे आदित्यनाथ म्हणाले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील अल्पसंख्यकांना आता मानाने जगता येईल, असेही ते म्हणाले.