नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 हजारांच्या पुढे गेला आहे. देशभरातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी 27 एप्रिलला सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहे.
पंतप्रधान मोदी 27 एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
देशभरामध्ये पहिल्यांदी 24 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला होता. मात्र, परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने दुसऱ्यांदा 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
देशभरामध्ये पहिल्यांदी 24 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला होता. मात्र, परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने दुसऱ्यांदा 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. तर 20 एप्रिलपासून काही राज्यांनी लॉकडाऊनमधून सुट दिली आहे. तर तेलंगाणा राज्याने 7 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. राज्य सरकारांना याबबात निर्णय घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने राज्य सरकारही सावधपणे निर्णय घेत आहे.
एक महिन्यापासून देशामध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. एकीकडे अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आवाहन असताना कोरोनालाही देशातून समुळ नष्ट करण्याचे आवाहन सरकारपुढे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 एप्रिलला पुन्हा राज्य सरकारांमधील परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येतील.