नवी दिल्ली -देशभरात वाढत्या कोरोनाचा प्रसारामुळे आरोग्य आणिबाणी निर्माण झाली आहे. संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, 14 एप्रिलनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवणार का यावर सरकार विचार करत आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची विनंती पंतप्रधान मोदींना केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्याशी 11 एप्रिलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. त्यावेळी अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
11 एप्रिलला पुन्हा पंतप्रधान सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद - लॉकडाऊन बातमी
14 एप्रिल तारीख जवळ येत असल्याने लॉकडाऊन वाढणार की नाही, यावर देशभरात नागरिकांमध्ये संभ्रामावस्था आहे. 11 तारखेला पंतप्रधान सर्वराज्यामधील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतील.
14 एप्रिल तारीख जवळ येत असल्याने लॉकडाऊन वाढणार की नाही, यावर देशभरात नागरिकांमध्ये संभ्रामावस्था आहे. 11 तारखेला पंतप्रधान सर्वराज्यामधील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता देशातील सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्येही भीती पसरली आहे.
लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वात जास्त हाल होत आहेत. लॉडकडाऊन काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशा मजुरांना सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येत आहे. दोन दिवसांपुर्वी पंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. आता शनिवारी पुन्हा ते सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतील.