नवी दिल्ली -कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये 3 आठवड्यांचा लॉकडाऊन 24 मार्चला जाहीर करण्यात आला आहे. सर्व देशातील व्यवहार ठप्प झाले असून पंतप्रधान मोदींनी नागरिकांना घरामध्ये राहण्याचे आवाहन केले आहे. उद्या (शुक्रवार) सकाळी 9 वाजता पंतप्रधान मोदी देशवासियांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी करणार आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पंतप्रधान दुसऱ्यांदा नागरिकांशी संवाद साधणार आहेत. याबाबातची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 9 वाजता देशवासियांना करणार संबोधित
उद्या सकाळी 9 वाजता पंतप्रधान मोदी देशवासियांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी करणार आहेत. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर पंतप्रधान दुसऱ्यांदा नागरिकांशी संवाद साधणार आहेत. याबाबातची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
आज पंतप्रधान मोदींनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. कोरोना पूर्णपणे आटोक्यात आला नसून आजाराची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशभरातील लॉकडाऊन उठवण्यासंबंधी सर्वंकष रणनीती आखण्यावर मोदींनी भर दिला. देशभरातील लॉकडाऊन उठवण्यासाठी राज्यांनी सांगोपांग विचार करून केंद्राला कल्पना सूचवाव्यात असे ते म्हणाले.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यसरकारे संचारबंदीचे काटेकोरोपणे पालन करत असल्याबद्दल त्यांनी राज्यांचे कौतूक केले. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, गृहमंत्रालय आणि सर्व राज्य सरकारे मिळून कोरोनाचा सामना करत आहेत. केंद्र सरकाराने कोरोनासंबंधी उपाययोजना लागू करण्यासाठी मंत्रीगटाची स्थापना केली आहे. त्याद्वारे वारंवार परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.