चंदीगड- हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यामध्ये मोदींच्या चार जंगी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील दोन सभा आज राज्यातील चारखाई दादरी आणि कुरुक्षेत्र येथे होणार आहेत. तर शेवटची सभा हिसार येथील जाट बहुल भागामध्ये १८ ऑक्टोबरला होणार आहे.
वल्लभगड येथे झालेल्या पहिल्या सभेप्रमाणेच या सभेतही मोदी मनोहरलाल खट्टर सरकारने केलेल्या कामांची लोकांना आठवण करुन देण्याची शक्यता आहे. तसेच कलम ३७० रद्द केल्याचा पुनररुच्चार करण्याची शक्यता आहे. वल्लभगड येथील रॅली तिहेरी तलाक कायद्याला विरोध केल्यावरुन त्यांनी काँग्रेसवर हल्ला केला होता.