लंडन :गुरुवारपासून लंडनमध्ये सुरू होत असलेल्या 'इंडिया ग्लोबल वीक २०२०' मध्ये पंतप्रधान मोदी भाषण करणार आहेत. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते जगाला संबोधित करतील. भारतातील व्यापार आणि परराष्ट्र गुंतवणूकीसंबंधी विषयावर ते भर देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
यासोबतच, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, रेल्वे मंत्री पियुष गोयल, नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद आणि कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे यांचीही भाषणे या परिषदेमध्ये होणार आहेत.