महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तंदुरुस्त भारतासाठी 'फिट इंडिया मूव्हमेंट' : पंतप्रधान मोदी करणार शुभारंभ - इंदिरा गांधी स्टेडियम

नागरिकांनी तंदुरूस्त आणि निरोगी राहण्यासाठी 'फिट इंडिया मूव्हमेंट' या अभियानाचा आज दिल्लीतून शुभारंभ होणार आहे.

फिट इंडिया

By

Published : Aug 29, 2019, 10:14 AM IST

नवी दिल्ली - नागरिकांनी तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी 'फिट इंडिया मूव्हमेंट' या अभियानाचा आज दिल्लीतून शुभारंभ होणार आहे. नुकत्याच झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमातून मोदींनी आरोग्याचे महत्त्व पटवत फिट इंडिया अभियानाची घोषणा केली होती. आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमध्ये या अभियानाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत.

फिट इंडिया अभियान उद्धाटनाचे लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शन वाहिनीवरून सकाळी १० वाजता केले जाणार आहे. फिट इंडिया अभियानामुळे देशातील सर्व नागरिकांना तंदुरुस्त आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटेल. लोकांमध्ये या अभियानामुळे जनजागृती घडून येईल आणि त्यांना आरोग्याचे महत्त्व पटेल, असे मोदींनी मन की बात कार्यक्रमामध्ये सांगितले होते.

युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने (युजीसी) सर्व महाविद्यालयांना या अभियानात सहभागी होण्यास सांगितले आहे. तसेच फिट इंडिया अभियानाचा उद्धाटन कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details