नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जूनपासून कोळश्याच्या खाणींचा व्यावसायिक उत्पादनासाठी लिलाव करणार आहेत. आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत खाण उद्योगाचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी सरकार लिलाव करणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लिलावाचे उद्धाटन मोदी करणार आहेत. अंदाजे 50 कोळसा ब्लॉक लिलावात देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
'अनलिशिंग कोल: न्यू होप फॉर आत्मनिर्भर भारत' अशी संकल्पना या लिलाव कार्यक्रमाची ठेवण्यात आली आहे. आम्ही पहिल्यांदाच व्यावसायिक खाण लिलाव 18 जूनला आयोजित करत आहोत. भारताला कोळसा उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी मोदींची दुरुदृष्टी आणि मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. आपण सर्वजण हे ध्येय गाठण्यासाठी एकाच मार्गावर आहोत, असे ट्विट कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले आहे.