महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जागतिक शाश्वत विकास परिषदेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन - जागतिक शाश्वत विकास परिषद २०२१

भारताच्या एनर्जी आणि रिसोर्सेस इन्स्टिट्यूटद्वारे (TERI) या परिषदेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विसावी परिषद पार पडत आहे. १० ते १२ फेब्रुवारी दोन दिवस ऑनलाइन पद्धतीने ही परिषद पार पडणार आहे.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

By

Published : Feb 10, 2021, 10:29 AM IST

नवी दिल्ली - जागतिक शाश्वत विकास परिषद-२०२१ चे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत. आज (बुधवार) सायंकाळी ६.३० ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमात मोदींच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. 'रिडिफाईनिंग आवर कॉमन फ्यूचर: सेफ अॅन्ड सिक्युअर एनव्हायर्नमेंट फॉर ऑल' अशी यावर्षीच्या परिषदेची थीम आहे. शाश्वात विकासाचे ध्येय गाठण्यासाठी या परिषदेत विचार मंथन होणार आहे.

अनेक देशांचे प्रमुख, तज्ज्ञ सहभागी होणार -

भारताच्या एनर्जी आणि रिसोर्सेस इन्स्टिट्यूटद्वारे (TERI) या परिषदेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विसावी परिषद पार पडत आहे. १० ते १२ फेब्रुवारी दोन दिवस ऑनलाइन पद्धतीने ही परिषद पार पडणार आहे. अनेक देशांचे प्रमुख, अधिकारी, शिक्षण तज्ज्ञ, हवामान बदल तज्ज्ञ, युवक, पर्यावरणाशी संबंधीत व्यक्ती या परिषदेत सहभागी होणार आहेत. सर्व घटक एकत्र येऊन पर्यावरण रक्षणासाठी आणि शाश्वत विकासासाठी काम करण्याचे उद्दिष्ट या परिषदेच्या आयोजनामागे आहे.

भारताचे पर्यावरण खाते, नवीकरणीय उर्जा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय ही परिषद आयोजित करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. उर्जा आणि उद्योग, हवामान बदल, स्वच्छ महासागर, हवा प्रदूषण, चक्रीय अर्थव्यवस्था, पर्यावरणाशी जुळवून घेणे यासारख्या विषयावर चर्चा होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details