नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवारी) सकाळी ११ वाजता 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमातून भारतवासीयांशी संवाद साधणार आहेत. याआधी त्यांनी १८ ऑगस्टला या कार्यक्रमासंदर्भात नागरिकांकडून काही सूचना , कल्पना मागविल्या होत्या. पंतप्रधान मोदींचा आज होणारा मन की बात हा ६८ वा कार्यक्रम आहे.
पंतप्रधान मोदी आज 'मन की बात' मधून देशवासीयांना संबोधणार - मन की बात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमातून भारतवासीयांशी संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
गेल्या महिन्यातील ६७ व्या मन की बात या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. पाकिस्तानने भारताच्या भूमीवर कब्जा करण्याचा आणि त्यांच्या देशातील अंतर्गत संघर्ष संपवण्याची भ्रामक योजना तयार केली होती, असा निशाणा मोदी यांनी पाकिस्तानवर साधला. तसेच कारगिल युद्धाच्या विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना भारतीय जवानांच्या शौर्य कथा प्रसारीत करण्याचे आवाहन केले होते.