महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता देशवासियांशी संवाद साधणार

file pic
पंतप्रधान मोदी

By

Published : May 12, 2020, 12:22 PM IST

Updated : May 12, 2020, 2:03 PM IST

12:21 May 12

पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता देशवासियांशी संवाद साधणार

नवी दिल्ली - १७ मे ला देशभरामध्ये लागू असेलला तिसरा लॉकडाऊन संपणार आहे. काल(सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर आज मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन वाढणार, की नागरिकांना आणखी सूट मिळणार हे समजणार आहे. 

सोमवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल, तेलंगाणासह  अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली. तर काही राज्यांनी लॉकडाऊनमध्ये सुट देण्याची मागणी केली आहे. छत्तीसगड, कर्नाटक, आंध्रप्रदेश, बिहार आणि तामिळनाडू राज्यांनी आंतरराज्य प्रवासचा निर्णय विचारपूर्वक घेण्याचे मत मांडले. रेल्वे सेवा सुरु करण्याच निर्णय चुकीचा असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार म्हणाले. 

दरम्यान, काल झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी चौथ्या लॉकडाऊनचा उल्लेख केल्यामुळे, देशात चौथे लॉकडाऊन लागू होण्याचे संकेत दिसून येत आहेत. यासोबतच पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा १५ मेला बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. देशातील अनेक जिल्ह्यांतून कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून त्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये झाला आहे. तर काही राज्यामध्ये अजूनही कोरोना हॉटस्पॉट असून परिसर कन्टेन्मेंट केले आहेत.

काल(सोमवार) मुख्यंंत्र्यांशी झालेल्या बैठकीत काय म्हणाले मोदी

आपल्याकडे आता देशातील कोरोना प्रसाराची संपूर्ण भौगोलिक माहिती आहे. कोणत्या भागामध्ये या विषाणूचा सर्वाधिक आणि सर्वात कमी प्रसार झाला आहे, याची माहिती आहे. तसेच, यावर कसे नियंत्रण ठेवायचे हे अगदी जिल्हापातळीवरील अधिकाऱ्यांनाही माहिती झाले आहे. हीच माहिती आपल्याला कोरोनाशी लढण्यास उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळेच आता यापुढील पावले आपण वेगाने उचलू शकणार आहोत.
 

आपल्यासमोर दोन मुख्य आव्हाने आहेत, ती म्हणजे विषाणूचा प्रसार कमी करणे, आणि त्यासोबतच टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत करणे. या दोन्ही बाबींकडे आपल्याला काटेकोरपणे लक्ष द्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला काही नियम, निर्बंध पाळावे लागणार आहेत. अर्थात, पहिल्या लॉकडाऊनमध्ये लागलेले निर्बंध दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये जसेच्या तसे घेणे आवश्यक नव्हते. तसेच, दुसऱ्या लॉकडाऊनमधील सर्व निर्बंधांची आवश्यकता तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये नव्हती. त्याचप्रमाणे चौथ्या लॉकडाऊनमध्येही तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये असलेल्या निर्बंधांपैकी काही निर्बंध काढून टाकता येऊ शकतात. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, की आपल्याला आता ग्रामीण भागामध्ये होणारा कोरोनाचा प्रसार कसा रोखता आणि टाळता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. राज्य सरकारांनी राज्यांची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी जे उपाय सुचवले आहेत, त्यांवर विचार सुरू आहे. मी तुम्हा सगळ्यांना (मुख्यमंत्री) विनंती करतो, की १५ मेला तुम्ही आपापल्या राज्यांमधील लॉकडाऊनला कशा प्रकारे पुढे नेणार आहात, याची विस्तृत योजना घेऊन मला भेटाल. लॉकडाऊनदरम्यान, तसेच लॉकडाऊन शिथील केल्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती तुम्ही कशा प्रकारे हाताळणार आहात, याची योजना तुम्ही मला सादर कराल, असे पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना सांगितले.


 

Last Updated : May 12, 2020, 2:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details