नवीन कृषी सुधारणांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. लोक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. काही लोक मंड्या बंद राहतील अशी अफवा पसरवत आहेत. कायदे लागू झाल्यानंतर बरेच महिने उलटले आहेत, देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात एकही मंडी बंद पडल्याची बातमी ऐकली आहे का, असा सवाल मोदींनी केला.
'शेतकरी संवाद अभियान' : नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा - PM address to farmers LIVE
13:39 December 25
13:38 December 25
गेल्या काही महिन्यांत सुमारे अडीच कोटी छोटे शेतकरी किसान क्रेडिट कार्डशी जोडले गेले आहेत. आम्ही आता मत्स्यपालक आणि पशुधन उत्पादकांना किसान क्रेडिट कार्ड देत आहोत, असे मोदींनी सांगितले.
13:37 December 25
शेतकर्यासाठी फक्त बाजारपेठच नाही तर पिकाची विक्री करण्यासाठी नवीन बाजारपेठ देखील असावी. आम्ही देशातील एक हजाराहून अधिक कृषी मंडळे ऑनलाईन जोडली आहेत. त्यापैकी एक लाख कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा व्यापार झाला आहे.
13:36 December 25
या कृषी सुधारणांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना अधिक चांगले पर्याय दिले आहेत. या कायद्यांनंतर शेतकरी आपले उत्पादन ज्यांना पाहिजे तसे विकू शकता. जिथे योग्य किंमत मिळेल तेथे विक्री करू शकतात, असे मोदी म्हणाले.
13:11 December 25
शेतकर्यांच्या जीवनात आनंद आपल्या सर्वांचा आनंद वाढवितो. सर्व देशवासीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. माझी अशी इच्छा आहे की हा ख्रिसमस उत्सव जगात प्रेम, शांती आणि सौहार्दाचा प्रसार करावा, असे मोदी म्हणाले.
13:11 December 25
आज एका क्लिकवर देशातील 9 कोटी पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये थेट जमा झाले आहेत. जेव्हापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासून 1 लाख 10 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचली आहे.
13:11 December 25
पश्चिम बंगालमधील 70 लाखाहून अधिक शेतकरी बंधू व भगिनींना हा लाभ मिळू शकलेला नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंगालच्या 23 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. परंतु राज्य सरकारने पडताळणी प्रक्रिया इतक्या दिवसांपासून थांबविली आहे.
13:02 December 25
विरोधकांनी पंजाबच्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. एमएसपीवरून राजकारण केलं जात आहे. शेतकऱ्यांच्या नावावरून संघटना आंदोलन करत आहेत. यांना वृत्तपत्रे आणि माध्यमांमध्ये झळकायचं आहे. निर्दोष शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. याच लोकांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांचा विकास केला नाही. पूर्वीच्या सरकारच्या धोरणामुळे लहान शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं.
12:59 December 25
मोदींची ममतांवर टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना राज्यात लागू केली नाही. यावरून मोदींनी ममतांवर टीका केली.
12:58 December 25
मोदींचा शेतकऱ्यांशी संवाद
आल्याची शेती करणाऱ्या अरुणाचल प्रदेश मधल्या गगन यांनी कंत्राटी शेतीबद्दलचे आपले अनुभव पंतप्रधान मोदींना सांगितले. याचबरोबर मोदींनी ओडिशा, हरयाणा, मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
12:21 December 25
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी मोदींनी साधला संवाद -
महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातून गणेश राजेंद्र भोसले यांच्याशी मोदींनी संवाद साधला. गणेश भोसले हे औसा तालुक्यातील मातोळा गावातील रहिवासी आहेत. यावेळी मोदींनी त्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता का, असा सवाल केला. 2019 साली पंतप्रधान पीक योजनेत 2580 रुपयांचा प्रिमियम भरला होता. परंतु, पावसामुळे सोबयाबीनच्या पिकाचं नुकसान झालं. त्यामुळे मला 54, 315 रुपयांची मदत 'पंतप्रधान पीकविमा योजने'द्वारे मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
12:20 December 25
पंतप्रधान विविध राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.
12:14 December 25
कृषी कायद्यांचा शेतकऱ्यांना फायदाच - नरेंद्र सिंह तोमर
देशभरातील शेतकऱ्यांना कृषी कायद्यांचा फायदा होणार आहे. पंजाबमधील काही शेतकऱ्यांमध्ये कायद्यांविषय थोडा संशय आहे. मात्र, मी त्यांना सांगतो की, कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.
12:14 December 25
शेतकरी लाभार्थ्यांसाठी 18 हजार कोटी रुपयांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत कोटी शेतकरी लाभार्थ्यांसाठी 18 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा जमीन होईल. त्यामुळे त्यांना फायदा होईल, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.
12:09 December 25
सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार
तीन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. एमएसपी व्यवस्था कोणीच मोडीत काढू शकत नाही. तसेच त्यांची जमीनही कोणीच हिसकावून घेणार नाही. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नेहमीच तयार आहे. विरोधकांच्या अफवाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे अमित शाह म्हणाले.
12:09 December 25
कृषी कायद्यावरून विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. एमएसपी व्यवस्था कायम राहणार आहे - अमित शाह
11:50 December 25
'शेतकरी संवाद अभियान' : नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा
नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपकडून शेतकरी संवाद अभियान राबवण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाचे अनेक नेते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत एक बटण दाबून 9 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये 18 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले.
भाजपचे सर्व वरिष्ठ मंत्री कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. आज 9 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 18 हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ होणार झाला. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये थेट अनुदान दिलं जातं. 2 हजार रुपयाप्रमाणं तीनवेळा ही रक्कम बँकेत जमा होते. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा या वर्षातील तिसरा हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या आधीचे हप्ते हे कोरोना काळात जमा करण्यात आले आहेत.
काय आहे शेतकरी सन्मान निधी योजना?
पीएम किसान योजना अर्थात शेतकरी सन्मान नीधी योजना 1 डिसेंबर 2018पासून देशात लागू करण्यात आली. या अंतर्गत वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. आतापर्यंत 96 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. या योजनेचं वार्षिक बजेट हे 75 हजार कोटी रुपये इतकं आहे.
पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग -
शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो.