बोडो शांतता कराराने आसाममध्ये नवी पहाट उजाडेल; बोडोलँडला दीड हजार कोटींचे पॅकेज - कोक्राझार मोदी भाषण
अनेक दशकांपासून आसाममध्ये हिंसाचार सुरू होता. आसामममध्ये शांतात प्रस्थापित होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. बोडो स्टुडंट युनियन, नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रँट ऑफ बोडोलँड आणि बोडोलँड टेरिटोलियल काउन्सिल या संघटनांमधील सर्व तरुण आणि सदस्यांचे मोदींनी आभार मानले.
पंतप्रधान मोदी बोलताना
नवी दिल्ली - बोडो करारावर सह्या झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रथमच आसाम राज्याला भेट दिली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा पास झाल्यानंतरही मोदींची ही पहिलीच भेट आहे. मोदींनी आसाममधील बोडो प्रदेशातील कोक्राझार जिल्ह्यात जाहीर सभा घेतली. ईशान्य पूर्वेमध्ये आता कोणत्याही नागरिकाचा हिंसाचारात मृत्यू होणार नाही. इशान्येकडील राज्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
बोडो शांतता करार झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी बोडो प्रदेशाला दीड हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. अनेक दशकांपासून आसाममध्ये हिंसाचार सुरू होता. आसामममध्ये शांतात प्रस्थापित होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. बोडो विद्यार्थी संघटना, 'नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रँट ऑफ बोडोलँड' आणि 'बोडोलँड टेरिटोलियल काउन्सिल' या संघटनांमधील सर्व तरुण आणि सदस्यांचे त्यांनी आभार मानले.
सरकार आता बोडो करारातील ६ वा क्लॉज (आर्टिकल) लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. या करारामुळे प्रदेशात कायमची शांतता प्रस्थापित झाली आहे. आसाम सरकारने नुकतेच गृह मंत्रालयाच्यावतीने बोडो बंडखोरांसोबत शांतता करारावर सह्या केल्या. या करारानंतर दीड हजार बंडखोरांनी आत्मसमर्पन केले. नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रँट ऑफ बोडोलँड या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या सदस्यांनीही आत्मसमर्पन केले. मागील ५० वर्षांपासून बोडो भागातील विविध गट वेगळ्या राज्याची मागणी करत होते. त्यामुळे आत्तापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे.
Last Updated : Feb 7, 2020, 3:54 PM IST