महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रशियामध्ये मोदींनी दिला वाजपेयींच्या आठवणींना उजाळा, शेअर केली १८ वर्षांपूर्वीची दुर्मीळ छायाचित्रे

२००१ मध्ये शिखर परिषदेसाठी मी वाजपेयी यांच्यासोबत आलो होतो. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री आणि पुतिन रशियाचे अध्यक्ष होते. तेव्हापासूनच आमच्या मैत्रीची सुरवात झाली. असे ते पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.

नरेंद्र मोदी

By

Published : Sep 5, 2019, 9:12 AM IST

नवी दिल्ली/व्लादिवोस्तोक -पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी दोन्ही देशादरम्यान महत्त्वाच्या करारावर सह्या झाल्या आहेत. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

२००१ मध्ये शिखर परिषदेसाठी मी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत आलो होतो. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री आणि पुतिन रशियाचे अध्यक्ष होते. तेव्हापासूनच आमच्या मैत्रीची सुरवात झाली. असे ते पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले.

२००१ च्या शिखर परिषदेमधील अटलबिहारी वाजपेयी यांच्या सोबतची छायाचित्र त्यांनी आपल्या टि्वटरवर शेअर केली आहेत. यामध्ये ते पुतिन यांच्या पाठीमागे उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्यासोबत जसवंत सिंहदेखील उभे आहेत. दुसऱ्या छायाचित्रामध्ये मोदी हे वाजपेयी यांच्या बाजूला बसल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा -पंतप्रधान मोदींचा पुतिन यांच्यासह जहाज प्रवास, व्यतीत केला 'क्वालिटी टाईम'

दोन्ही देशादरम्यान विविध करारांवर सह्या झाल्या असून त्यामध्ये सागरी सुरक्षा, नैसर्गिक वायू, हवाई ऊर्जा, संरक्षण, अशा एकूण १५ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. याचबरोबर भारत आणि रशिया हे दोन्ही देश कुठल्याही देशाच्या अंतर्गत प्रश्नात इतर देशांनी हस्तक्षेप करण्याच्या विरोधात असल्याचे मोदी आणि पुतिन यांनी चर्चेनंतर सांगितले. पंतप्रधानांची तिसरी द्विपक्षीय रशिया भेट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details