मथुरापूर (पश्चिम बंगाल) - अमित शाह यांच्या रॅलीमध्ये हिंसाचार झाला, त्यावेळी तृणमुलच्या गुंडांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार घडवला, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडला. तिथे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले होते. ज्याप्रमाणे शारदा चिटफंड प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यात आले त्याचप्रणाणे कोलकातामधील घटनांचे देखिल पुरावे बंगालच्या सरकारने नष्ट केले आहेत. या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी मोदी यांनी केली.