महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुंबई पूल दुर्घटना : शोकाकूल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी - पंतप्रधान - mourning

सीएसएमटीजवळील पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघातात ३ महिलांसह ५ जणांचा मृत्यू झाला. तर २९ जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

PM Modi

By

Published : Mar 14, 2019, 11:08 PM IST

Updated : Mar 14, 2019, 11:57 PM IST

मुंबई- सीएसएमटीजवळील पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघातात ३ महिलांसह ५ जणांचा मृत्यू झाला. तर २९ जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या अपघातानंतर पंतप्रधानांनी दुःख व्यक्त करताना, आपण शोकाकूल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

मुंबईतील पादचारी उड्डाणपूलाच्या दुर्घटनेतील मृतांची माहिती समजल्यानंतर अत्यंत दुःख झाले. शोकाकूल कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. या अपघातात प्रभावित झालेल्यांना महाराष्ट्र सरकार शक्य ती सर्वप्रकारची मदत करेल.


Last Updated : Mar 14, 2019, 11:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details