महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'रोड-शो' नंतर मोदींनी केली गंगा आरती; उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

पंतप्रधान मोदी उद्या वाराणसीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर दशाश्वमेध घाटावर त्यांनी गंगा नदीची आरती केली.

पंतप्रधान मोदी आरती करताना

By

Published : Apr 25, 2019, 3:05 PM IST

Updated : Apr 25, 2019, 9:09 PM IST

वाराणसी - पंतप्रधान मोदी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज आपले शक्तीप्रदर्शन केले. सायंकाळी ५ वाजता पासून त्यांनी ७ किलोमिटर पर्यंत रोड शो केला. दरम्यान त्यांचे अनेक समर्थक तेथे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी दशाश्वमेध घाटावर गंगा नदीची आरती केली. आपल्त्यांया रोडशमध्ये त्यांनी भाजपला मत देण्याचे आवाहन केले.याावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, जे. पी. नड्डा इत्यादी नेते हजर होते

या मार्गाने केले शक्तीप्रदर्शन

पंतप्रधान मोदींनी आपल्या रोड शोची सुरूवात बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या परिसरातील पंडित मदन मोहन मालविय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केली. त्यानंतर त्यांची रॅली लंका चौक येथे दाखल झाली होती. यावेळी या चौकात त्यांचे अनेक समर्थक जमले होते. लंका चौकातून त्यांची मिरवणूक अस्सी घाटाच्या दिशेने वाढत होती. सोनपूरा या मुस्लीम बहुल परिसरातूनही त्यांची ही रॅली गेली होती. त्यांनतर त्यांची रॅली दशाश्वमेध घाटावर पोहोचली. येथे गंगाआरतीसाठी भव्य दिव्य व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल एक तास चाललेल्या विधीवत पुजेत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.


वाराणसीला छावणीचे स्वरूप, इतके जवान सुरक्षेसाठी तैनात


या रोड शो साठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. १० हजारांहून अधिक जवान वाराणसीत तैनात होते. रोड शोच्या आधी बुधवारी पोलीस-प्रशासनाने लंका चौकापासून दशाश्वमेध घाटापर्यंत पायी चालत 'रोड शो'ची रंगीत तालीम केली.


२६ एप्रिलला मोदी वाराणसी येथे नामांकन अर्ज भरतील.


रात्री साधारण ८:३० वाजेपर्यंत पंतप्रधान मोदी कँटोनमेंटयेथील हॉटेलमध्ये आयोजित प्रबुद्ध जन सम्मेलनात सहभागी होतील. रात्री साधारण १०:३० वाजता पंतप्रधान मोदी येथून निघून डीएलडब्ल्यू गेस्ट हाउस येथे पोहोचतील. २६ एप्रिलला सकाळी कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर १०:३० वाजते ते त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघतील. सर्वात आधी ते काळभैरव मंदिरात पोहोचतील. तेथे दर्शन घेतल्यानंतर ते वाराणसीला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना होतील.

Last Updated : Apr 25, 2019, 9:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details