न्युयॉर्क- पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिल आणि मिलिंडा गेटस् फाउंडेशनने 'ग्लोबल गोलकीपर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबवल्यामुळे त्यांना या पुरस्कारामे सन्मानित करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते मोदींना पुरस्कार देण्यात आला.
ज्या लोकांनी स्वच्छ भारत अभियान जनआंदोलनात बदलले त्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे मोदी म्हणाले. तसेच भारत पाणी वाचवण्यासाठी जलजिवन अभियान, फिट इंडिया अभियानावरही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आमच्या उद्दिष्टांच्या जवळ जात आहोत, असे मोदी म्हणाले.
मोदी सरकारने २०१४ साली स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानाद्वारे देशामध्ये स्वच्छतेसंदर्भात मोठं काम करण्यात आलं. देशामध्ये घरगुती तसेच सार्वजनिक शौचालये मोठ्या प्रमाणावर बांधण्यात आली. तसेच घन कचऱ्याचे व्यवस्थपानही व्यवस्थितपणे करण्यात आले. त्यामुळे मोदींना पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले.