नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इमाम हुसेन (एसए) यांच्या हौतात्म्याचे आज स्मरण केले. इमाम हुसेन यांचे बलीदान नेहमीच आठवणीत राहील. त्यांच्यासाठी सत्य आणि न्याय मुल्यांपेक्षा महत्त्वपूर्ण दुसरे काहीच नव्हते. समानता आणि निष्पक्षता कायम ठेवण्यासाठी त्याचा जोर असायचा. त्यांचे प्रयत्न अनेकांना प्रेरित करतात, असे मोदी म्हणाले.
'इमाम हुसेन यांची मुल्ये प्रेरीत करतात'
'मोहरम' हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुस्लीम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात.

नोहा आणि मरसिया कवितांतून शोक व्यक्त केला जातो. शिया धर्मीयांमध्ये या परंपरेस अत्यंत महत्त्व आहे. मोहरम हा आनंदाचा सण नसून दु: खाचा दिवस आहे. शिया समुदायातील लोक १० दिवस काळे कपडे घालतात. या बलिदानासाठी जुलूस काढला जातो.