नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कला विश्वातील कलाकारांनी शॉर्ट फिल्मच्या माध्यामतून जनजागृती करत घाबरु नका, खबरदारी बाळगा, असा संदेश दिला आहे. या शॉर्ट फिल्मचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतूक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले 'या' शॉर्ट फिल्मचे कौतूक... - sony tv short film
कला विश्वातील कलाकारांनी शॉर्ट फिल्मच्या माध्यामतून जनजागृती करत घाबरु नका, खबरदारी बाळगा, असा संदेश दिला आहे. या शॉर्ट फिल्मचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतूक केले आहे.
![पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले 'या' शॉर्ट फिल्मचे कौतूक... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले 'या' शॉर्ट फिल्मचे कौतूक...](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6704923-388-6704923-1586313153007.jpg)
'आपण दुर राहूनही सोशल होऊ शकतो. या संकटात चांगला संदेश देणारा हा व्हिडिओ आहे. एक वेळेस नक्की पाहा', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार महानायक अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, मामुटी, अभिनेत्री प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सर्व फॅमिली या शॉर्ट फिल्मसाठी एकत्र आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या सर्व कलाकारांनी आपापल्या घरात राहूनच या शॉर्ट फिल्म चे शूटिंग केले आहे. ही शॉर्ट फिल्म अवघ्या ४ मिनिटांची आहे. या शॉर्ट फिल्म मधून नागरिकांना जास्त तणाव घेऊ नका. ही वेळ देखील निघून जाईल, घाबरु नका, खबरदारी बाळगा, असा संदेश देण्यात आला आहे.