नवी दिल्ली/व्लादिवोस्तोक -पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह छोट्या जहाजावरून प्रवास केला. रशियाच्या २ दिवसीय दौऱ्यादरम्यान मोदी झ्वेझ्दा शिपबिल्डिंग येथे प्रथम भेट देणार आहेत. मोदींच्या या भेटीला रशियाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे, हे लक्षात घेऊन पुतिन यांनी मोदींसह या आलिशान बोटीतून प्रवास केला. दोन नेत्यांमधील चर्चेमधून जहाज बांधणीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण सहकार्य होऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये जहाजबांधणी क्षेत्रामध्ये संधी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी म्हटले आहे. ते आणि पुतिन शीप बिंल्डींग कॉम्लेक्सच्या भेटीनंतर २० व्या द्विपक्षीय शिखर बैठकीला जाणार आहेत. मोदी आणि पुतिन यांच्या जहाज प्रवासानंतर भारत आणि रशियादरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होण्याचे वारे वाहू लागले आहेत, अशी मोठी चर्चा सुरू झाली आहे.