नवी दिल्ली -बुद्ध पौर्णिमेनिमित्त आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या सहकार्यातून सांस्कृतिक मंत्रालयात आज कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. यावेळी मोदींनी देशवासियांना बोद्ध पोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. 'भगवान बुद्धांनी भारताची संस्कृती समृद्ध केली. त्यांनी आपल्या जीवनयात्राद्वारे इतरांचे जीवन प्रकाशमय केले. कठीण परिस्थितीचा निरंतर सामना करून त्यावर विजय मिळवला पाहिजे, ही शिकवण भगवान बुद्धांनी दिली. ती आपण आज अंमलात आणण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
कोरोना संकटात अनेक लोक २४ तास करत आहेत. या लोकांचे आभार मानने गरजेचे आहे. आपण वैश्विक दायित्यावाचे पालन केले असून कोरोना संकटात इतर देशांना मदत केली आहे. भारत नि: स्वार्थपणे कोरोना संकटात अडकलेल्या प्रत्येकासोबत उभा आहे, असे मोदी म्हणाले.
वेळ, परिस्थिती बदलली, मात्र भगवान बुद्धाच्या विचारानंना आपल्या जिवनात विशेष स्थान आहे. भगवान बुध्द म्हणजे, एक पवित्र विचार असून समर्पणाची भावना आहेत. कोरोना संकटात प्रत्येक जण लढा देत आहे. या संकटात बुद्धाची शिकवण महत्त्वाची आहे. बुद्धांनी सांगितलेले करुणा, दया, समभाव आणि स्वीकार हे चार मार्ग भारतासाठी प्रेरणादायी आहेत, असे मोदी म्हणाले.