महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ayodhya Judgment: 'निकाल जय-पराजयाच्या भावनेतून पाहू नका, राम-रहीम भक्तीपेक्षा भारतभक्तीची ही वेळ - पंतप्रधान - Supreme Court #AyodhyaJudgment

अयोध्या बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालाकडे जय पराजयाच्या भावनेतून कोणीही पाहू नये -

पंतप्रधान

By

Published : Nov 9, 2019, 1:41 PM IST

नवी दिल्ली - अयोध्या बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालाकडे जय पराजयाच्या भावनेतून कोणीही पाहू नये, राम भक्ती असो किंवा रहीम भक्ती असो, ही वेळ भारतभक्तीला आणखी बळकट करण्याची आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

शांती, एकता आणि सद्भावना राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले. हा निकाल अनेक गोष्टींमुळे महत्त्वाचा असल्याचे मोदींनी म्हटले आहे. कोणताही वाद सोडवताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन महत्वाचे असते. प्रत्येक पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. न्यायमंदिरामध्ये शांतातापूर्ण मार्गाने अनेक शतकांपासून चालू असलेल्या वादाचे निराकरण झाले. हा निर्णय नागरिकांमध्ये न्यायाव्यवस्थेबद्दल विश्वास आणखी मजबूत करणारा आहे, असे मोदी म्हणाले.
हजारो वर्षांपासून देशामध्ये बंधुभावाची भावना आहे. त्यानुसार १३० कोटी भारतीयांना शांती आणि संयमाचे दर्शन घडवावे, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.

ABOUT THE AUTHOR

...view details