महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घेतली आडवाणींची भेट - Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी घेतली जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. दोघांनी या ज्येष्ठ नेत्याच्या पाया पडून त्यांचे आशिर्वाद घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घेतली आडवाणींची भेट

By

Published : May 24, 2019, 4:11 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी घेतली जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. दोघांनी या जेष्ठ नेत्याच्या पाया पडून त्यांचे आशिर्वाद घेतले.

भाजपच्या मार्गदर्शक मंडळात जेष्ठ नेत्यांना स्थान देऊन त्यांना अप्रत्यक्षिरित्या बाजूला सारण्यात आले होते. तसेच या दोन्ही जेष्ठ नेत्यांना यंदाच्या निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते. यामुळे भाजपातील जेष्ठ नेते व इतरांध्ये वाद असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मोदी आणि शाह यांनी आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्याभेटीस महत्व आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details