महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Howdy Modi : पंतप्रधान मोदी आठ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संध्याकाळी आठ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. टेक्सास प्रांतातील ह्युस्टन येथे मोदी अमेरिकी भारतीय समुदायाला 'हाऊडी मोदी' कार्यक्रमामध्ये संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान मोदी

By

Published : Sep 21, 2019, 1:50 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संध्याकाळी आठ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. टेक्सास प्रांतातील ह्युस्टन येथे मोदी अमेरिकी भारतीय समुदायाला 'हाऊडी मोदी' कार्यक्रमातून संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प हेदेखील सहभागी होणार आहेत. त्यानंतर २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला मोदी संबोधित करणार आहेत.

अमेरिका दौऱ्यामध्ये जग भरातील अनेक नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल, अशी माहिती मोदींनी ट्विटरद्वारे दिली आहे. या दौऱ्यात पॅसिफिक महासागर विभागातील लहान देशाच्या नेत्यांशी आणि कॅरेबियन गटातील देशांशीही चर्चा केली जाईल, असे मोदी म्हणाले.

या दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिका दोन्ही देशांतील संबध अधिक मैत्रिपूर्ण होतील, असे मोदी म्हणाले. या भेटीदरम्यान उद्योजकांशीही चर्चा केली जाणार आहे. अनेक उच्चस्तरीय कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

हाऊडी मोदी कार्यक्रमातून मोदी अमेरिकी भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात येत आहे. मात्र, पाकिस्तान धार्जिणे काही गट हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच खलिस्तानी चळवळीचे कार्यकर्तेही भारतविरोधी वातावरण निर्माण करत आहेत. 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. हाऊडी भारताची अर्थव्यवस्था कशी काय आहे, वाटत नाही चांगली आहे, असे ट्विट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details