केवडीया (गुजरात) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 31 ऑक्टोबर) गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडियाजवळील स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट दरम्यान सी-प्लेनचे अनावरण केले.
मोदींनी येथून सरदार सरोवर धरणाजवळील तलाव -3 येथून विमान प्रवास करत सेवेचे उद्घाटन केले. उद्घाटनापूर्वी मोदींनी या सेवेचा तपशील घेतला. तसेच सी-प्लेनची संपूर्ण माहिती घेतली. सी-प्लेन हे अहमदाबाद ते केवडिया हे 200 किमीचे अंतर केवळ 40 मिनिटांत पार करणार आहे. त्यामध्ये 19 जणांना बसण्याची क्षमता आहे. हे सी-प्लेन 300 मीटरच्या धावपट्टीवर उड्डाण घेऊ शकते.