नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी पंचायत राज दिनाचे औचित्य साधून देशातील सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मोदींनी पंचायती राज दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदींनी ई-ग्राम स्वराज्य पोर्टल आणि मोबाइल अॅप लाँच केले.
'स्वावलंबी होण्याचा संदेश कोरोना महामारीने दिलाय' - इ- ग्राम स्वराज्य पोर्टल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पंचायत राज दिनाचे औचित्य साधून देशातील सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
कोरोना विषाणूमुळे आपल्या जीवनशैलीवर आणि कार्य करण्याच्या पद्धतीवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोना विषाणूने बरीच आव्हाने उभी केली आहेत. मात्र, या कठीण परिस्थितीमधून आपण शिकले पाहिजे. प्रत्येकाने स्वावलंबी व्हावे, हा धडादेखील या महामारीने दिला आहे. पंचायत, जिल्हे आणि राज्ये ही स्वावलंबी बनली पाहिजेत, असे मोदी म्हणाले.
मजबूत पंचायत हा एक स्वावलंबी होण्याचा पाया आहे. पंचायती यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने सातत्याने कार्य केले आहे. ब्रॉडबँड कनेक्शन 1.25 लाखाहून अधिक पंचायतींवर पोहोचले आहे. शहर आणि गावचे अंतर कमी करण्यासाठी सरकारने प्रत्येक ग्रामस्थांसाठी ई-ग्राम स्वराज आणि स्वामीत्व योजना असे दोन प्रकल्प सुरू केल्याचे मोदी म्हणाले.