महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये आयुष्मान भारत योजनेचा आज शुभारंभ - आयुष्मान भारत योजनेचा जम्मू काश्मीरमध्ये शुभारंभ

जम्मू काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (AB-PMJAY SEHAT) शुभारंभ केला. पंतप्रधान मोदी यांनी योजना सुरू केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना देशभरातील 24,148 रुग्णालयांमध्ये पोर्टेबिलिटी अंतर्गत विम्याची सुविधा मिळू शकेल, असे सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनीही काश्मीरमधील जनतेला संबोधीत केले.

मोदी
मोदी

By

Published : Dec 26, 2020, 4:12 PM IST

श्रीनगर -जम्मू आणि काश्मीर जनतेला आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधील सुमारे 15 लाख कुटुंबांना 'आरोग्य' भेट दिली आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (AB-PMJAY SEHAT) मोदींनी आज शुभारंभ केला. या अंतर्गत जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना आरोग्य विम्याचा लाभ मिळणार आहे. तब्बल 26 महिन्यांनंतर काश्मीरमधील रहिवाशांना आरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली. या योजनेद्वारे खोऱ्यातील लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच मिळू शकेल. पीएम मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला होता.

नरेंद्र मोदी यांच्या वतीने जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्मीरमधील प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील लाभार्थ्यांना ई-कार्ड वाटप केले. जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक व्यक्ती आणि समुदायाला परवडणारी आणि चांगली आरोग्य सेवा देण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे. पीएम मोदीसमवेत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या योजनांचा आणि खोऱ्यात उचललेल्या पावलांची प्रशंसा केली.

पंतप्रधान मोदी यांनी योजना सुरू केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना देशभरातील 24,148 रुग्णालयांमध्ये पोर्टेबिलिटी अंतर्गत विम्याची सुविधा मिळू शकेल, असे सांगितले. तसेच गृहमंत्री अमित शाह यांनीही काश्मीरमधील जनतेला संबोधीत केले. जम्मू काश्मीरसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. जम्मू-काश्मीरमधील 15 लाख कुटुंबांना 5 लाखांपर्यंत सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळतील, असे शाह म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे -

  • आज जम्मू-काश्मीरसाठी ऐतिहासिक दिवस आहेत. आजपासून जम्मू-काश्मीरमधील सर्व लोकांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. जम्मू-काश्मीरमधील आपल्या लोकांच्या विकासासाठी हे पाऊल उचलण्यात आले, याबद्दल मला खूप आनंद झाला आहे.
  • जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीने एक नवा अध्याय लिहिला आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक मतदारांच्या चेहऱ्यावर मला विकासाची आशा दिसली. या निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीरच्या लोकांनी लोकशाहीची मुळे मजबूत करण्याचे काम केले आहे.
  • जम्मू-काश्मीरमधील या निवडणुकांनीही आपल्या देशात लोकशाही किती मजबूत आहे, हे दाखवून दिले.
  • जम्मू-काश्मीरमध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत 10 लाखाहून अधिक शौचालये बांधली गेली. पण फक्त हेतू केवळ शौचालय बांधण्यापुरता मर्यादित नव्हता, तर लोकांचे आरोग्य सुधारण्याचा देखील हा प्रयत्न होता.

हेही वाचा -तवांग सेक्टरमधील सीमेवर आयटीबीपी जवान हाय अलर्टवर

ABOUT THE AUTHOR

...view details