नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी झालेल्या या वर्षातील पहिल्या 'मन की बात' कार्यक्रमात केरळमधील एका दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तीची स्वच्छता करण्यासाठी देत असलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा केली.
पंतप्रधान म्हणाले, 'केरळमधील आणखी एक बातमी मला सांगाविशी वाटते. ही ज्या व्यक्तीची आहे, त्यांचे कार्य आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देते. केरळच्या कोट्टायममध्ये एक दिव्यांग वयोवृद्ध व्यक्ती आहे. त्यांचे नाव एन. एस. राजप्पन आहे. अर्धांगवायू झाल्यामुळे ते चालण्यास असमर्थ आहेत. परंतु स्वच्छतेबाबतची त्यांची बांधिलकी कमी झालेली नाही.'
हेही वाचा -मन की बात : '२६ जानेवारीला दिल्लीत तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे संपूर्ण देश दु:खी'