नवी दिल्ली -आयुष मंत्रालय 2016 पासून दरवर्षी धनत्रयोदशीच्या निमित्ताने 'आयुर्वेद दिवस' साजरा करते. यंदा आज म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाचव्या आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने दोन आयुर्वेद संस्था देशाला समर्पित केल्या. गुजरातच्या जामनगरमधील भारतीय आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन (आयटीआरए) आणि राजस्थानमधील जयपूरची राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचे त्यांनी आज उद्घाटन केले. यावेळी त्यांनी देशवासीयांना संबोधित केले. आयुर्वेद हा देशाच्या आरोग्य धोरणाचा महत्त्वाचा हिस्सा आहे, असे ते म्हणाले.
आजचा दिवस गुजरात-राजस्थानसाठी विशेष
कोरोनाविरोधात लढण्यासाठी आयुर्वेद परिणामकारक ठरले. या संकटात आयुर्वेदिक औषधांची मागणी वाढली आहे. यंदाचा आयुर्वेद दिवस गुजरात आणि राजस्थानसाठी विशेष आहे. आयुर्वेदाच्या विस्तारामुळे संपूर्ण मानवजातीचा विकास होईल. आज ब्राझिलच्या राष्ट्रीय धोरणामध्ये आयुर्वेदाचा समावेश आहे, असे मोदींनी सांगितले.