नवी दिल्ली -भाजपचा विजय ही विश्वातील सर्वात मोठी घटना आहे. भारतातील जनतेने आम्हाला विजयी करुन या फकीराची झोळी भरली असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले. भाजपच्या दिल्ली येथील मुख्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत.
जनतेने आम्हाला विजयी करुन या फकीराची झोळी भरली - पंतप्रधान मोदी
भारतातील जनतेने आम्हाला विजयी करुन या फकीराची झोळी भरली असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले. भाजपच्या दिल्ली येथील मुख्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत.
पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले...
- या विजयामुळे पुर्ण जगाला भारताच्या लोकशाहीला चांगल्या पध्दतीने ओळखता येईल.
- १३० कोटी भारतीयांना वंदन करतो.
- हा विजय जनतेच्या चरणी अर्पण.
- या लोकसभा निवडणुकीत कोणताही पक्ष धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरू शकला नाही. धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घातलेल्यांचा बीमोड झाला.
- कोणताही पक्ष माझ्या आणि भाजपविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध करू शकला नाही.
- भारताच्या उज्ज्वल करण्याची हमी देतो. या निवडणुकीत सर्वाधिक मतदान झाले. ही निवडणूक जनतेने लढवली.
- या निवडणुकीने देशासमोर एक उदाहरण ठेवले आहे. २०१९ पासून २०२४ पर्यंतचा कार्यकाळ महत्त्वाचा आहे. या काळात जगाला अचंबित करणारी निवडणूक घडली आहे.
- या देशात आता केवळ २ जाती राहतील. संपूर्ण देश या २ जातींमध्येच असेल. भारतातील एक जात आहे 'गरीब' आणि दुसरी जात 'गरिबीपासून मुक्त करू इच्छिणारी'. याव्यतिरिक्त जातींचा वापर करणाऱ्यांचे भांडवल काढून घेतले आहे.
- हेच गांधीजींच्या जन्मशताब्दीचे आणि भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होणारे वर्ष आहे. त्यामुळे हा विजय महत्त्वाचा आहे.
- इतका मोठा विजय मिळाल्यानंतरही नम्रतेने पुढे जायचे आहे. संविधानाला प्रमाण मानून चालणार आहोत. देशाने आम्हाला खूप काही दिले आहे.
- तुम्ही या फकिराची झोळी तर भरलीत. तुमच्या आशा-आकांक्षा, अपेक्षा यात सामावलेल्या आहेत. २०१४ मध्ये तुम्ही मला ओळखत नसताना माझ्यावर विश्वास टाकलात. आता मला ओळखल्यानंतर मला २०१९ मध्ये तुम्ही मला आणखी भरभरून दिलेत. जसा विश्वास वाढतो, तशा जबाबदाऱ्याही अधिक वाढतात.
- मी येणाऱ्या काळात वाईट इच्छेने आणि वाईट हेतूने कोणतेही काम करणार नाही. काम करताना माझ्याकडून चूक होऊ शकते. मात्र, मी कोणाचे जाणीवपूर्वक कोणाचे वाईट करणार नाही. मी माझ्या स्वतःसाठी काही करणार नाही, याचीही खात्री देतो.
Last Updated : May 23, 2019, 8:42 PM IST