नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या सुरूवातीला दसर्याला शुभेच्छा दिल्या. दसर्याचा हा उत्सव असत्यावर विजय मिळवण्याचा सण आहे, पण त्याचबरोबर संकटावर संयम राखून विजय मिळवण्याचा सणही आहे, असे ते म्हणाले. यापूर्वी दसर्याला मोठ्या जत्रा भरत. पण यावेळी त्यांचे स्वरूप वेगळे आहे. "रामलीलाचा सण देखील एक मोठे आकर्षण होते, परंतु त्यावर काही निर्बंध आले आहेत, असे मोदी म्हणाले.
'खरेदी करताना व्होकल फॉर लोकल हा संकल्प जरूर लक्षात ठेवा' - मन की बात मधील मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या सुरूवातीला दसर्याला शुभेच्छा दिल्या. दसर्याचा हा उत्सव असत्यावर विजय मिळवण्याचा सण आहे, पण त्याचबरोबर संकटावर संयम राखून विजय मिळवण्याचा सणही आहे, असे ते म्हणाले. बाजारातून वस्तू खरेदी करताना आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
नरेंद्र मोदी
मोदींच्या भाषणातील काही मुद्दे -
- बाजारातून वस्तू खरेदी करताना आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यावे. खरेदी करताना, व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा.
- आपण त्या शूर सैनिकांची देखील आठवण ठेवावी, जे या उत्सवांवतही सीमेवर उभे राहिले आहेत. देशाची सेवा आणि संरक्षण करीत आहेत. त्यामुळे आपण त्यांचे स्मरण करून सण साजरे करावे. मी शूर सैनिकांना हे देखील सांगू इच्छितो की, जरी आपण सीमेवर असलात तरी संपूर्ण देश आपल्या पाठीशी आहे.
- देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आपण 31 ऑक्टोबर रोजी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना गमावले. मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो.
- आपण नेहमीच प्रेमानं आणि प्रयत्नपूर्वक आपल्या छोट्या छोट्या कामांमधून, एक भारत श्रेष्ठ भारत, हे तत्व सुंदर रंगात साकार करत राहायचं आहे. त्यात एकतेचे नवे रंग भरायचे आहेत. मी आपणा सर्वांना http://ekbharat.gov.in वेबसाइटला भेट देण्याची विनंती करतो. या संकेतस्थळावर, आपली राष्ट्रीय एकतेची मोहिम पुढे नेणारे अनेक प्रयत्न पाहायला मिळतील.
- ३१ ऑक्टोबरला आपण वाल्मिकी जयंती देखील साजरी करतो. महर्षी वाल्मिकी यांचे विचार नव्या भारताच्या संकल्पाची प्रेरणा आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी रामायणासारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली, आम्ही महर्षी वाल्मिकी यांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहूत.
- दिल्लीत कॅनॉट प्लेस इथं एका खादीच्या दुकानात गांधी जयंतीच्या दिवशी एक कोटी रूपयांपेक्षा अधिक खादीची खरेदी झाली. खादीचे मास्क लोकप्रिय होत आहेत. अनेक स्वयंसहाय्यता गट आणि संस्था खादीचे मास्क बनवत आहेत. खादीच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच, जगात अनेक ठिकाणी, खादी तयारही केली जात आहे.