बहारीन- पंतप्रधान नरेंद्र मोदी बहारीनच्या दौऱ्यावर असताना माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर दुख: व्यक्त केले. ज्या मित्राबरोबर जीवनाचा प्रवास केला, आज तो मित्र, साथ सोडून गेला. बहारीनमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, मला खूप दुख: होत आहे, असे भावूक उद्गार मोदींनी काढले.
मी एवढ्या लांब असताना माझा जिवलग मित्र या जगातून गेला, अरुण जेटलींच्या निधनाने मोदी भावूक - मोदी बहारीन देशाच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी बहारीनच्या दौऱ्यावर असताना माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर दुख: व्यक्त केले.
बहारीन नॅशनल स्टेडियममध्ये अंदाजे १५ हजार भारतीयांच्या समुदायाला मोदींनी संबोधित केले. मला कल्पना करू वाटत नाही, मी येथे आहे, आणि माझा जीवलग मित्र अरुण जेटली या जगातून निघून गेला. मी कर्तव्याने बांधलो गेलो आहे. तर दुसरीकडे माझे मन दु:खात बुडालेले आहे. भारत कृष्णजन्माष्टमीचा आनंद साजरा करत आहे. मात्र, मी माझ्या मित्राच्या जाण्याने व्यथित झालो आहे, असे मोदी म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच आमचे सहकारी सुषमा स्वराज यांचे निधन झाले. आता माझा मित्र अरुण या जगातून गेला, असे मोदी म्हणाले. मोदींनी शनिवारी अरुण जेटली यांच्या पत्नी आणि मुलाशी बोलून शोक व्यक्त केला. विदेश दौरा रद्द न करण्याचे जेटली कुटुंबीयांनी मोदींनी सांगितले.