नवी दिल्ली - नाशिकमध्ये काल झालेल्या भीषण अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केले आहे. पीएमओ इंडिया या आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.
महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये झालेला अपघात हा दुर्दैवी आहे. या दुःखद प्रसंगी मी मृतांच्या नातेवाईकांसोबत आहे. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच इच्छा. अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे.