महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

औरंगाबाद दुर्घटना : पंतप्रधांनानी व्यक्त केले दुःख, आतापर्यंत १६ जणांचा झालाय मृत्यू.. - Aurangabad migrant labors accident

महाराष्ट्राच्या औरंगाबादमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या बातमीने मी व्यथित झालो आहे. याबाबत मी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोललो आहे. ते या घटनेवर पूर्ण लक्ष ठेऊन आहेत. राज्य सरकारला हवी असणारी सर्व मदत दिली जात आहे. अशा आशयाचे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

Modi on aurangabad accident
औरंगाबाद दुर्घटना : पंतप्रधांनानी व्यक्त केले दुःख, आतापर्यंत १६ जणांचा झालाय मृत्यू..

By

Published : May 8, 2020, 10:24 AM IST

औरंगाबाद - जिल्ह्याच्या करमाडजवळ आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. रेल्वे रुळांवर झोपलेल्या १७ मजूरांना एका मालगाडीने चिरडले, यात १६ मजूरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दुःख व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राच्या औरंगाबादमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या बातमीने मी व्यथित झालो आहे. याबाबत मी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोललो आहे. ते या घटनेवर पूर्ण लक्ष ठेऊन आहेत. राज्य सरकारला हवी असणारी सर्व मदत दिली जात आहे. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

औरंगाबादमध्ये शुक्रवारी भल्या पहाटे एक भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान प्रवासात ते औरंगाबदपर्यंत आले होते. रात्र झाल्याने सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सविस्तर वाचा :लॉकडाऊनची संहारकता.. औरंगाबादजवळ १६ परप्रांतीय मजुरांना मालगाडीने चिरडले, एक गंभीर

ABOUT THE AUTHOR

...view details