बंगळुरू -देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशी संशोधन क्षमता वाढावी, या उद्देशाने सरकार पाऊले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच नव्या डीआरडीओ प्रयोगशाळांचे अनावरण केले.
पंतप्रधान मोदी सध्या दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. बंगळुरूमध्ये त्यांनी वैमानिकी विकास आस्थापनेच्या एका कार्यक्रमामध्ये या प्रयोगशाळांचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी डीआरडीओच्या काही नवीन संशोधनांचीही पाहणी केली. त्यांच्या सोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि डीआरडीओचे चेअरमन जी. सतीश रेड्डी हेदेखील उपस्थित होते.