लेह (लडाख) -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचे प्रमुख बिपीन रावत हे लेह येथे दाखल झाले आहेत. आज (शुक्रवारी) माध्यमांना कल्पना न देता पंतप्रधान लडाखला गेले असल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीडीएस प्रमुख रावत भारत-चीन लडाख येथील सद्यपरिस्थितीवर पंतप्रधानांना माहिती देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सीडीएस प्रमुख बिपीन रावत लडाखमध्ये दाखल - PM Modi leh visit
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचे प्रमुख बिपीन रावत हे लेह येथे दाखल झाले आहेत. आज (शुक्रवारी) माध्यमांना कल्पना न देता पंतप्रधान लडाखला गेले असल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
भारत आणि चिनी जवानांच्या झटापटीमध्ये भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर गलवान दरी आणि लडाख येथील परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा लडाख दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. समुद्रसपाटीपासून तब्बल 11 हजार फुट उंचावर असलेल्या 'निमू' या पोस्टवर पंतप्रधानांची लष्करी अधिकाऱयांसोबत बैठक सुरू आहे.
पूर्व लडाख सेक्टर येथे सीडीएस प्रमुख रावत हे 14 जवांनांसोबत पंतप्रधानांना माहिती देत आहेत. यावेळी लष्कर प्रमुख मनोज नरवणे हेही उपस्थित आहेत. तसेच आयटीबीपी, इंडियन आर्मी एअर फोर्सचे जवान तेथे उपस्थित आहेत.