नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २४ नोव्हेंबरला 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे, पंतप्रधानांनी लोकांना या कार्यक्रमासाठी विषय सुचवण्याचे आवाहन केले आहे.
'मन की बात'मध्ये आता 'जन की बात'..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून लोकांना या कार्यक्रमासाठी विषय सुचवण्याचे आवाहन केले आहे. एका टोल फ्री नंबरवर कॉल करून, किंवा 'माय जीओव्ही' आणि 'नमो' या अॅप्सच्या माध्यमातून लोक आपल्या कल्पना मांडू शकतात.
Mann ki baat on 24th November