नवी दिल्ली - शपथविधीनंतर मोदींनी पहिला निर्णय घेताना वीरमरण आलेल्या जवानांच्या मुलांसाठी असलेल्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत मोठे बदल केले आहेत. नवीन बदलांनुसार, दर महिन्याला असलेली मुलींची शिष्यवृत्ती २ हजार २५० वरुन ३ हजार तर, मुलांची शिष्यवृत्ती २ हजारांवरुन २ हजार ५०० रुपये करण्यास पंतप्रधान मोदींनी मंजुरी दिली आहे.
पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोदी सरकारचा मोठा निर्णय; हुतात्मा जवानांच्या मुलांची वाढवली शिष्यवृत्ती - नवी दिल्ली
मुलींची शिष्यवृत्ती २ हजार २५० वरुन ३ हजार तर, मुलांची शिष्यवृत्ती २ हजारांवरुन २ हजार ५०० रुपये करण्यास पंतप्रधान मोदींनी मंजुरी दिली आहे.

मोदींनी याबाबत ट्वीट करताना लिहिले आहे, की आम्ही पहिला निर्णय देशाची सुरक्षा करणाऱ्यांसाठी समर्पित करतो. दहशदवादी, नक्षलवादी आणि माओवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांसह राज्य पोलीस कर्मचारी यांच्या मुलांसाठी असलेल्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत मोठे बदल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
दहशतवादी, नक्षलवादी आणि माओवादी हल्ल्यात वीरमरण आलेले जवान, राज्य पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा निधीतर्फे पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. १९६२ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा निधीतर्फे देशासाठी सुरक्षा पुरवणाऱ्या जवानांच्या कल्याणासाठी काम केले जाते. यामध्ये, भारतीय जवान, पॅरा-मिलिटरी फोर्स, रेल्वे सुरक्षा दल आणि त्यासंबंधी विभागातील जवानांसाठी काम करण्यात येते.