नवी दिल्ली - राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कोरोना विषाणू (साथीचा रोग) विरूद्ध लढणार्या डॉक्टरांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तसेच डॉक्टर स्वत: ला धोक्यात घालून जीव वाचवत आहेत, असे मोदी म्हणाले. मोदींनी राष्ट्रीय चार्टर्ड अकाऊंटंट दिनानिमित्तही देशभरातील सीए (चार्टर्ड अकाऊंटंट ) यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
संकटकाळात अग्रभागी राहून कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या डॉक्टारांना सलाम, असे टि्वट मोदींनी केले आहे. नुकत्याच झालेल्या भाषणातील एका छोट्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले होते, की आई बाळाला जन्म देते. तर डॉक्टर पुनर्जन्म देतात.