महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झाकिर नाईक यांच्या प्रत्यार्पणाविषयी मलेशियाचे पंतप्रधान व मोदींमध्ये चर्चा - मुस्लिम धर्मगुरु झाकिर नाईक

मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद आणि मोदींमध्ये विवादित मुस्लिम धर्मगुरु झाकिर नाईकच्या प्रत्यर्पणाविषयी रशियात चर्चा झाली.

मोदी महातीर भेट

By

Published : Sep 5, 2019, 1:06 PM IST

मॉस्को - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. आज (गुरूवारी) ते ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी जपान, मलेशिया आणि मंगोलिया देशांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद आणि मोदीमध्ये विवादित मुस्लीम धर्मगुरु झाकिर नाईकच्या प्रत्यर्पणाविषयी चर्चा झाली.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींचा पुतिन यांच्यासह जहाज प्रवास, व्यतीत केला 'क्वालिटी टाईम'

पंतप्रधान मोदींनी मोहम्मद महातीर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. त्यावेळी मोदींनी विवादीत धर्मगुरु झाकिर नाईक यांच्या प्रत्यर्पणाविषयी चर्चा केली. दोन्ही देशांतील अधिकारी याविषयी एकमेकांच्या संपर्कात राहतील असा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली.

हेही वाचा - द्विपक्षीय शिखर बैठकीपूर्वी मोदी-पुतीन यांची गळाभेट

यावेळी मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या मध्येही चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. लवकरच शिंजो अॅबे भारत दौऱ्यावर येणार आहेत. याविषयीही चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली.

ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम बैठकीत मोदी प्रमुख पाहुणे

पंतप्रधान मोदी आज ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणानंतर मोदी रशियाला गेले. या बैठकीत आंतराष्ट्रीय मुद्द्यांसह व्यापारविषयक चर्चा होणार आहे. बुधवारी भारत आणि रशियामध्ये १५ करारांवर सह्या झाल्या. यावेळी मोदींनी पुतिन यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details