नवी दिल्ली - ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांसह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.
पंडित जसराज यांच्या निधनावर पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह देशातील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली - पंतप्रधान मोदींची पंडीत जसराज यांना श्रद्धांजली
पंडित जसराज यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाहांनी वाहिली श्रद्धांजली.
'पंडित जसराज यांच्या दुदैवी निधनाने भारतीय सांस्कृतीक क्षेत्रात शुन्यता निर्माण झाली आहे. केवळ त्यांची सादरीकरणाची शैलीच नाही, तर इतर अनेक गायकांसाठी मार्गदर्शन करून त्यांनी त्यांची ठसा उमटविला आहे. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती.' असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
'संगीत मार्तंड पंडित जसराज हे एक अविश्वसनीय कलाकाल होते, ज्यांनी आपल्या जादूई आवाजाने भारतीय संगीताला समृद्ध केले. त्यांच्या निधन म्हणजे आपलं कोणी गमावल्याची भावना आहे. मात्र, ते त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून सदैव आपल्यात राहतील. त्यांचे कुटुंबीय आणि अनुयायांच्या दु:खात मी सामील आहे. ओम शांती.' असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.