सुरत- गुजरताच्या सुरत शहरात इमरातीला लागलेल्या इमरातीत होरपळून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पंतप्रधान मोदीसह गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ट्वीटरवरून या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील टीमला पाठवू, असे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी जाहीर केले आहे.
सुरत आग : मोदींनी व्यक्त केले दु:ख, गरज पडल्यास दिल्ली 'एम्स'मधील डॉक्टरांच्या टीमला पाठवणार - cm vijay rupani comment on surat fire
पंतप्रधान मोदी यांनी या घटनेची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. जखमींवर तत्काळ उपचार करण्यासाठी मदतकार्य करण्याचे आदेश त्यांनी राज्य सरकारला दिले आहेत.
सुरत शहरातील सरथाणा परिसरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या तक्षशिला या इमारतीला भीषण आग लागली. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर शिकवणी वर्ग असल्याने तेथे अनेक विद्यार्थी होते. तसेच या इमरातीत अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने असल्याने ग्राहकही मोठ्या संख्येने तिथे होते. आगीची तीव्रता एवढ्या झपाट्याने वाढत गेली की तेथील नागिरकांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याने अनेकांनी भितीने थेट तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या. या घटनेत एकूण १९ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ४ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
या घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री सुरतकडे रवाना झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर उपचार करण्यासाठी आवश्यकता पडल्यास दिल्लीतील एम्स रुग्णालयातील टीमलाही पाठवू असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. जखमींवर तत्काळ उपचार करण्यासाठी मदतकार्य करण्याचे आदेश त्यांनी राज्य सरकारला दिले आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही ट्विटरवरून मृतांसाठी संवेदना व्यक्त केल्या असून जखमींना लवकर मिळण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना घटनास्थळावर मदत करण्याचे आवाहन केले आहे.