महाराष्ट्र

maharashtra

मोदी-शाह बिहार निवडणुकीच्या रिंगणात; भाजपचे स्टार प्रचारक म्हणून निवड

By

Published : Oct 12, 2020, 6:57 AM IST

भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसोबत केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, खासदार मनोज तिवारी, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे.

PM Modi, Amit Shah among BJP's star campaigners for Bihar elections
मोदी-शाह बिहार निवडणुकीच्या रिंगणात; भाजपचे स्टार प्रचारक म्हणून निवड

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची निवड भाजपचे स्टार प्रचारक म्हणून करण्यात आली आहे. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचाही समावेश आहे. बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपल्या ३० स्टार प्रचारकांची यादी रविवारी जाहीर केली.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसोबत केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, खासदार मनोज तिवारी, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही यापूर्वीच आपली स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शत्रुघ्न सिन्हा आणि इतर काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील आपल्या पक्षाचे प्रमुख प्रचारक म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे यंदा बिहार निवडणुकीत मोदी-गांधी-पवार असे सर्वच दिसून येतील.

बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details