बिश्केक - दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशांना दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार ठरवून दहशतवाद संपवण्यासाठी सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. किर्गिझस्तान येथील बिश्केक शहरात आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर संमेलनात ते बोलत होते.
दहशतवाद संपवण्यासाठी सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज- नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही पहिलीच महत्वाची आंतरराष्ट्रीय परिषद आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या या संमेलनात ८ देश सहभागी झालेले आहेत.
बिश्केक येथील शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी किर्गिझस्तान दौऱ्यावर आहेत. यावेळी किर्गीझस्तानचे राष्ट्रपती सोरनबे जिनबेकोव यांनी त्यांचे स्वागत केले. या परिषदेत मोदींनी दहशतवादावर निशाणा साधला असून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या देशांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील ही पहिलीच महत्वाची आंतरराष्ट्रीय परिषद आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या या संमेलनात ८ देश सहभागी झालेले आहेत. १९९६ साली या संघटनेची स्थापना झाली होती. या संमेलनादरम्यान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चिनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी पाकिस्तान दहशतवादाबाबतीत सुधारणा करत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. तसेच चीन आणि भारत यांच्यात सौहार्द निर्माण होऊन व्यापारी संबंध दृढ करण्याविषयी त्यांनी चर्चा केली. सीमाप्रश्न चर्चेने सोडवून सकरात्मक उपाययोजना करण्यासंबंधीही यावेळी विचार विनिमय करण्यात आला.