अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना फोन करून राज्यातील पूरस्थितीची माहिती जाणून घेतली. आंध्रप्रदेशमधील पुरस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिल्याचे आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.
आंध्रप्रदेशच्या पूरस्थितीची पंतप्रधानांनी फोनद्वारे मुख्यमंत्र्यांकडून घेतली माहिती - Heavy rains in Andhra Pradesh
पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सोमवारी मुसळधार वृष्टी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. सामान्यस्थिती पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
संपादित
पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सोमवारी मुसळधार वृष्टी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. सामान्यस्थिती पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना दिली. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने आंध्रप्रदेशमधील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.